महाराष्ट्रातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर येत आहे.

 

नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.तर संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढवला पाहिजे. कोणत्याही एखाद्या राज्यात लॉकडाऊन हटवणे योग्य होणार नाही, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केले.

Protected Content