गोपाळपुरा येथे रस्ता दुरुस्तीच्या कामाला महापौरांच्या हस्ते सुरुवात !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील प्रभाग ३ मधील गोपाळपुरा ते कालिंका माता चौफुली आणि गोपाळपुरा ते असोदा रस्तापर्यंत मुख्य डांबरी रस्ते दुरुस्तीच्या कामाला आज मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास महापौर भारती सोनवणे यांच्याहस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

तीन ते चार महिन्यांपासून शहरात अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामांमुळे अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अनेक नागरीकांसह वाहनधारकांना रस्त्यांचा सामना करावा लागत आहे. आज मंगळवारी शहरातील गोपाळपुरा ते कालिंका माता चौफुली आणि गोपाळपुरा ते असोदा रस्तापर्यंत भागातील मुख्य रस्त्या दुरूस्तीच्या कामांना सुरूवात करण्यात येत आहे. यावेळी महापौर भारती सोनवणे यांच्याहस्ते नारळ फोडून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली. यावेळी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, महिला बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, प्रवीण कोल्हे, दत्तात्रय कोळी, भारत सपकाळे, मनपा बांधकाम अभियंता श्री.रंधे यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन्ही रस्ते मुख्य रहदारीचे असल्याने नागरिकांचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Protected Content