चिंताजनक : कोरोनामुळे अमेरिकेत मागील २४ तासांत २,१०८ लोकांचा बळी

 

वाशिंग्टन (वृत्तसंस्था) मागील २४ तासांत अमेरिकेमध्ये  कोरोना व्हायरसने तब्बल २,१०८ लोकांचा बळी घेतला आहे. एका दिवसांत दोन हजारांपेक्षा जास्त मृत्यूची नोंद झालेला अमेरिका हा पहिलाच देश आहे.

 

अमेरिकत आतापर्यंत तब्बल १८,७६३ नागरिकांना कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर कोरोना बाधितांची संख्या ५, ०४, ७८० इतकी झाली आहे. जगातील १९३ देश आणि प्रदेशांमध्ये १६ लाख ४७ हजार ६३५ हून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी, किमान ३ लाख ६९ हजार ११६ लोक बरे झाल्याचे मानले जात आहे. तर एक लाख २६० जणांचा मृत्यू झाला आहे. जगात महामंदी येणार असल्याचा इशाराही शुक्रवारी जागतिक नाणेनिधीने दिला आहे.

Protected Content