कळमसरे येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे येथे बंधन युवा व स्मितोदय फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात परिसरातील बहुसंख्य गरजवंतानी लाभ घेतल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गावातील श्रीराम मंदिर चौकात हे नेत्रतपासनी शिबीर आयोजित करण्यात आले होते. माजी आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन पार पडले.यावेळी माजी जि प सदस्य ऍड व्ही आर पाटील अध्यक्षस्थानी होते.

मुंबई पुरस्कृत संदीप फाउंडेशन शारदा नेत्रालयचे डॉ.खावीद पिंजारी, डॉ. यामीन पिंजारी डॉ. सत्यविर, हेमंत खैरनार, अमोल रणदिवे, योगेश कुलकर्णी यांच्या पथकाने उपस्थित रुग्णांची नेत्रतपासनी केली. जवळपास कळमसरे सह परिसरातील सर्वच गरजवंतानी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरात सुमारे 250 च्या जवळपास रुग्णांची तपासणी होऊन 150 जणांना नेत्रदोष असल्याने अशा रुग्णांना चष्मा नंबर देऊन औषधोपचार करण्यात आलेत. तर उर्वरीत 98 जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया चे कारण निष्पन्न झाले.

दरम्यान आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या गरजूंना धुळे येथील नामांकित रुग्णालयात पुढील शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. हे शिबिर आरोग्य दूत ग्राम पंचायत सदस्य संदीप उर्फ शिवाजी राजपूत यांनी आयोजित केले होते. यावेळी ग्राम पंचायत सदस्य गणेश चौधरी दिनकर चव्हाण तसेच अरुण चौधरी किरण पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content