विद्यापीठात ‘स्वास्थ संवर्धनाची गुरूकिल्ली योग’ या विषयावर व्याख्यान

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योग मार्गदर्शन केंद्राच्यावतीने दि.७ डिसेंबर रोजी ‘स्वास्थ संवर्धनाची गुरूकिल्ली: योग’ या विषयावर डॉ.लिना चौधरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

विद्यापीठाच्या योग मार्गदर्शन केंद्राद्वारे विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि वसतीगृहातील विद्यार्थी/विद्यार्थिंनींसाठी योग, आयुर्वेद या भारतीय वैद्यकीय पध्दतीचा वापर करून आरोग्य कसे चांगले ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्या अनुषंगाने ‘स्वास्थ संवर्धनाची गुरूकिल्ली: योग’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानापर्वूी यापुर्वी झालेल्या योग शिबिराचा लाभ घेतलेल्या प्रा.मनीषा इंदाणी, प्रा.व्ही.एम.रोकडे, श्री बालाक्रिष्ण इंदाणी यांनी योगामुळे काय फायदा होतो हे आपल्या मनोगातून सांगीतले. प्रास्ताविक योग मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख इंजि.राजेश पाटील यांनी केले. सुत्रसंचालक गौरव जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंत गरुड, हिंमत जाधव, सुनील चव्हाण, भिकन पाटील, मोतीराया, भगवान सांळुखे यांनी सहकार्य केले.

Protected Content