दुचाकी घेण्‍यासाठी विवाहितेचा छळ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दुचाकी घेण्यासाठी माहेरहून १ लाख रूपये आणावे, यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, लेानवाडी येथील मुळ रहिवासी अंजली आकाश पवार (वय-२४ ह.मु.सुप्रीम कॉलनी) जळगावच्या माहेरवाशीण आहेत. त्यांचा विवाह २४ एप्रील २०१९ मध्ये आशक दिलीप पवार (रा.सिल्वासा, दादरा नगर हवेली गुजरात) यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला आहे. लग्नानंतर देान महिने सासरच्या मंडळींनी चांगले वागवणूक दिली.  नंतर, मात्र वेगवेगळ्या कारणांनी छळ करण्यास सुरूवात केल.  सासरे दिलीप मांगलाल पवार यांनी दुचाकी घेण्यासाठी माहेरहून १ लाख रूपये आणावे असा तगादा लावला.

परंतू माहेरच्यांची परिस्थिती बिकट असल्याने पैसे दिली नाही. याचा राग आल्याने मारहाण व छळ सुरु केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पती आकाश दिलीप पवार, सासरे दिलीप मांगीला पवार, सासू जुगरीबाई दिलीप पवार सर्व रा. सिव्हासा, दादर नगर हवेली गुजरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संजय धनगर करीत आहेत.

 

Protected Content