विद्यापीठात ‘युक्रेन समस्या: नाटो विरुध्द रशिया’ विषयावर ऑनलाईन व्याख्यान

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षक आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे ‘युक्रेन समस्या: नाटो विरुध्द रशिया’ या विषयावर दक्षिण आफ्रिकेतील स्टेलेनबोश विद्यापीठातील प्रो.डॉ.श्रीकांत परांजपे यांचे बुधवार ९ रोजी ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

युक्रेन आणि रशियामध्ये वाढत चाललेला विवाद तिसऱ्या महायुध्दाची नांदी ठरेल का? आणि वादात अमेरिकेचा हस्तक्षेप तसेच नाटोचे युक्रेन भूमीवर होणारा संभाव्य प्रवेश यामुळे आशियाई अस्तित्व धोक्यात येईल का? तसेच भारताच्या विदेश नीतीवर काय परिणाम होऊ शकतात आणि येणाऱ्या काळात मध्य अशिया या युध्दाचे मैदान होईल का? यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. ऑनलाईन व्याख्यान सर्वांसाठी खुले असून http://meet.google.com/ghm-jexh-fcr या गुगल मीट लिंकवर सहभागी होता येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन संचालक डॉ.अनिल चिकाटे, डॉ.तुषार रायसिंग, डॉ. सुभान जाधव यांनी केले आहे.

Protected Content