आशा दिनानिमित्ताने आशा स्वयंसेविकांचा गौरव

aasha

जळगाव, प्रतिनिधी | सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आशा स्वयंसेविका यांच्या कामाची दखल घेतली जावी या उद्देशाने आशा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

आशा दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सुनंदा पाटील ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणुन उपसभापती एकनाथ लोखंडे व जि. प.सदस्य अमित देशमुख हे होते. माजी सभापती नीता पाटील, पं. स.सदस्य रमण चौधरी, प्रल्हाद पाटील, नवलसिंग पाटील, पं. स.गटविकास अधिकारी आय. सी. गोयल, डॉ.हर्षल चांदा, डॉ.मनोज तेली, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. योगेश राजपुत, डॉ. अजय पाटील, डॉ. उमाकांत पाटील, डॉ.आशिष महाजन, डॉ. पराग पाटील, डॉ. नंदलाल पाटील यांची उपस्थिती होती. यात रेखा ठोसर, ज्योती पवार, छाया सोनवणे, गीता पाटील,सिमा राजपुत, सुनिता कणेकर, सुनीता राठोड, ज्योती पाटील,मोनाली चव्हाण, नसीम बानो सय्यद, शीतल चौधरी, सोनुबाई तेली, वंदना सुरवाडे, मंगला चव्हाण आशा एकूण १४ आशा व ११ गटप्रवर्तक यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. जि. प.स्थायी समितीमध्ये निवड झाल्याबद्दल जि. प.सदस्य अमित देशमुख यांचा पंचायत समिती जामनेर व आरोग्य विभागाकडून सत्कार करण्यात आला. शिवाली देशमुख,अनुराधा कल्याणकर ,प्रदीप पाटील, सुशीला चौधरी, भागवत वानखेडे यांचा त्यांच्या आशास्वयंसेविका यांच्याशी संबंधित कार्या बद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास रवींद्र सूर्यवंशी, घृष्णेश्वर पाटील, अनंता अवचार, सुनील पाटील, गोपाळ पाटील, विजय पवार, सुधाकर माळी, सतिष पाटील यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पोटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले डॉ. नरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. पल्लवी सोनवणे यांनी आभार मानले.

Protected Content