बोदवड तालुक्यात घरफोडी करणारे दोघे एलसीबीच्या ताब्यात

LCB NEWS

जळगाव प्रतिनिधी – बोदवड तालुक्यातील जामठी येथील एटीएम फोडणारी टोळीतील दोन आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना बोदवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हकीकत अशी की, बोदवड तालुक्यातील जामठी येथे ११ जानेवारी रोजी च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गावातील मनुर रोडवरील शांतीलाला पुखराज जैन ॲग्रो मार्केट मधून दीड लाखांचा मका चोरुन नेला होता तर १४ जानेवारी रोजी मध्यरात्री जामठी रोडवरील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला गेला होता. या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उजनीच्या जंगलात लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी पथकाला रवाना करुन उजनी जंगलातील भुरा बाळु गायकवाड वय – २५ रा.भिलाटी ,बोदवड आणि आनंद गुलाब धुळकर, वय – २५, रा.भिलाटी, बोदवड यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना बोदवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर शंकर जगलु ठाकरे , गोविंदा अर्जुन गायकवाड , आकाश हरचंद गायकवाड , सदाशिव पंढरी पवार,  किसन उर्फ शेंडया कैलास सोनवणे, किसन संजय मोरे , प्रविण सुकलाल घुळकर हे अद्याप फरार आहेत.

Protected Content