रावेर येथे महसूल विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक

WhatsApp Image 2020 01 21 at 3.33.34 PM

रावेर, प्रतिनिधी | रावेर महसूल विभागाची महत्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असुन शेतकरी बांधवांची पीएम किसानचे काम देखिल लवकरात-लवकर करण्याच्या सूचना नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिल्या आहेत.

रावेर तहसिल कार्यालयात महसूल विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये महसूल वसूली शंभर टक्के करणे, अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालणे, शेतकरी बांधवांची पीएम किसान योजना संदर्भात येणाऱ्या त्रुटी लवकर दुरुस्त करून त्यांची समस्या सोडवा यासह अनेक महसूलच्या विविध विषयासंदर्भात नायब तहसिलदार संजय तायडे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. त्यानी बैठकीला उपस्थित तलाठी, मंडळ अधिकारी यांना याबाबत सूचना दिल्या. यावेळी नायब तहसिलदार सी. जी. पवार देखिल उपस्थित होते.

Protected Content