एच.जे.थीम महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय परिषद

WhatsApp Image 2020 01 21 at 2.22.47 PM

जळगाव, प्रतिनिधी | सुमारे दोन हजार वर्षापूर्वी जगात जैवविविधता समृध्द होती. आज वृक्षतोड, मानवी हव्यासामुळे हि जैवविविधता नष्ट होत आता काही टक्केच शिल्लक राहिली आहे. जैवविविधता वाचविण्यासाठी मानवाला कृती कार्यक्रम हाती घेऊन जैवविविधतेचे संरक्षण करावे लागेल, असे प्रतिपादन डॉ.ए.बी.चौधरी यांनी केले.  ते एच.जे.थीम महाविद्यालयात एकदिवसीय “शाश्वत विकासात रसायनशास्त्र आणि पर्यावरण शास्त्राच्या नाविन्यपूर्ण कल्पना” याविषयी राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. ए.बी.चौधरी पुढे म्हणाले की, पृथ्वीला प्रदुषणापासून रोखणे प्रत्येक मानवाचे आद्यकर्तव्य असून यासाठी स्वत:च्या घरातून सुरुवात केली पाहिजे. घातक पदार्थांचा वापर अधिक वाढविल्याने पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्राचे जीवन धोक्यात आलेले आहे.  मंचावर अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.करीम सालार तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव अ.गफ्फार मलिक, हैद्राबाद येथील शास्त्रज्ञ डॉ.जव्वाद पटेल, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. पी.पी. वडगावकर, मुंबई विद्यापीठाचे डॉ. एन. जी. शिंपी, प्राचार्य डॉ. सय्यद शुजाआत अली, महाविद्यालय विकास समिती चेअरमन डॉ. इक्बाल शाह, डॉ. ताहेर शेख उपस्थित होते. यावेळी गफ्फार मलिक, डॉ.इक्बाल शाह यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. करीम सालार यांनी, विज्ञान हे मानवता सेवेचे नाव आहे असे सांगत मानव प्रगती करीत चंद्रावर पोहोचला. मात्र, त्याला जमिनीवरील स्वर्ग कायम टिकविता आला नाही असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. आएशा बासित यांनी केले. आभार प्रा. साजिद मलक यांनी मानले. बीजभाषणात  पुणे येथील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळाचे शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. वडगावकर यांनी, आरोग्य व कृषीक्षेत्रात रसायनशास्त्राचे योगदान स्पष्ट करत शास्वत विकासासाठी आज रसायनशास्त्राचा वापर आवश्यक तेवढाच केला पाहिजे, असेही ते म्हणाले. दिवसभरात विविध सत्रे घेण्यात आली  यात दिवसभरात ६० पोस्टर सादरीकरण व ४६ शोधनिबंध सादर झाले. राज्यभरातून तसेच देशातील काही महाविद्यालय, विद्यापीठातून संशोधक उपस्थित होते. समारोपावेळी विद्यापीठातील युआयसीटीमधील तेल आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.जी.ए.उस्मानी उपस्थित होते. मंचावर अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.करीम सालार होते. यावेळी डॉ.उस्मानी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.तन्वीर खान यांनी तर आभार डॉ. मुस्तकीम बागवान यांनी मानले. परिषदेसाठी उपप्राचार्य डॉ. युसुफ पटेल, उपप्राचार्य प्रा.आय.एम.पिंजारी, अख्तर शहा, सदाशिव ढाके, डॉ. राजेश भामरे, प्रा. आर. सी. देवकर, प्रा. ए. एस. कुळकर्णी, डॉ. फिरदोस सिद्दिकी, डॉ. हाफिज शेख, डॉ. राजू गवरे, प्रा. कहेकशा अंजुम, प्रा.शबाना खाटिक, डॉ. वकार शेख, डॉ.चांद खान, डॉ. अमीन काझी आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content