डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या अनुषा, प्राकृत यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड

जळगाव प्रतिनिधी । अनुषा कोचर, प्राकृत पेडीशेट्टी या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची आतंरराष्ट्रीय स्तरावर संशोधनासाठी निवड झाली असून त्यांच्या निवडीमूळे डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकणारी अनुषा कोचर हीची पोलंडसाठी तर  प्राकृत यांची थायलंड येथे संशोधनासाठी निवड झाली आहे. आखिल भारतिय वैद्यकिय विदयार्थी संघटनातर्फे आतंरराष्ट्रीय संशोधन संस्थाव्दारा इतर देशातील विदयार्थ्यांसोबत सयुक्त संशोधन करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. आपल्या आवडीच्या विषयावर हे विद्यार्थी संशोधन करणार असून लवकरच एका महिन्याच्या कालावधीसाठी पोलंड व थायलंड येथे रवाना होणार आहे. त्यांच्या या निवडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून या विद्यार्थ्यांचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी व डॉ.वैभव पाटील, अधिष्टाता डॉ.एन आर्विकर, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांचेसह प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  त्यांच्या निवडीबद्दल डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात आनंद व्यक्त केला जात आहे.

 

Protected Content