ट्रकच्या काचा फोडून दोन बॅटऱ्या लांबविल्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील भारत गॅस पेट्रोलीयम कंपनीजवळ पार्कींगला उभा असलेल्या ट्रकच्या काचा फोडून १८ हजार रूपये किंमतीच्या दोन बॅटरी चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नरेंद्रसिंग सितलसिंग ढिल्लो वय ३७ रा. नशिराबाद,जळगाव हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जळगाव एमआयडीसीतील भारत गॅस पेट्रोलियम कंपनीच्या समोर नरेंद्रसिंग ढिल्लो याने त्याचा ट्रक क्रमांक (एमएच १९ सीवाय ८३८४) हा पार्कींगला लावलेला होता. अज्ञात व्यक्तीने ट्रकच्या काचा फोडून १८ हजार रूपये किंमतीच्या २ बॅटऱ्या चोरून नेल्याचे ८ मार्च रोजी पहाटे सव्वा ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याबाबत सर्वत्र माहिती घेतली परंतू चोरी केल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी १६ मार्च रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ समीर शेख हे करीत आहे.

Protected Content