Home Cities एरंडोल खडके खु॥ येथे विषारी द्रव्य प्राशन केल्याने एकाचा मृत्यू

खडके खु॥ येथे विषारी द्रव्य प्राशन केल्याने एकाचा मृत्यू

0
45
death


एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील खडके खु॥ येथील एकाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की गुलाब नथ्थू पाटील वय-५२ वर्षे या इसमाने विषारी औषध सेवन केले असता त्यास १४सप्टें २०२१ रोजी एरंडोल ग्रामीण रूग्णालय येथे उपचारार्थ नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याची तपासणी केली व तपासणी अंती त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. याबाबत झुंबरसिंग पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी हेड काँन्स्टेबल विलास पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

 


Protected Content

Play sound