Home क्राईम पेपर देण्यासाठी गेलेल्या बारावीच्या विद्यार्थीनीला फूस लावून पळविले

पेपर देण्यासाठी गेलेल्या बारावीच्या विद्यार्थीनीला फूस लावून पळविले


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका महिला महाविद्यालय परिसरातून पळवून नेल्याची घटना शुक्रवारी १५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलीचे शहरातील एका महिला महाविद्यालयात बारावीचे पेपर सुरू आहे. या अनुषंगाने शुक्रवारी १५ मार्च रोजी दुपारी ती पेपर देण्यासाठी घरातून निघून गेली. दरम्यान सायंकाळी ६ वाजता तिचा पेपर सुटला. त्यानंतर संशयित आरोपी सागर चुनीलाल बाविस्कर रा. जळगाव याने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. याबाबत पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी शनिवारी १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीसात सागर बाविस्कर विरोधात तक्रार दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपानि मिरा देशमुख हे करीत आहे.


Protected Content

Play sound