Home Cities पारोळा वसंतनगर येथील घरकुल घोटाळा व सिमेंट काँक्रेट रस्त्याची चौकशी करा; बंजारा सेनेची...

वसंतनगर येथील घरकुल घोटाळा व सिमेंट काँक्रेट रस्त्याची चौकशी करा; बंजारा सेनेची मागणी

0
137


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील वसंतनगर पारोळा जिल्हा जळगाव येथील विविध कामात भ्रष्टाचार झाले असून यांची चौकशी करण्यात यावी अशी अखिल भारतीय बंजारा सेना या पक्षाकडून माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती पारोळा यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. वसंत नगर येथील मुतारी बांधकाम करताना पायाचे खोदकाम झालेले नाही तसेच शोषक खड्डे करताना जास्तीत जास्त सांडपाणी त्या शोषखड्डात सोडावे असे कोणतीही योजना केलेली नाही.

शासनात दिशाभूल करून खोटे बिल सादर करून बिल लाटण्यात आले तसेच रस्ता कॉक्रेंटीकरण करत असताना मोठे मोठे दगड टाकून एका खाजगी ठेकेदाराकडून हे काम करून घेतले तसेच अंदाज पत्रकानुसार काम झालेले नाही तसेच निकृष्ट दर्जाचे काम आहे सिमेंट गटार करत असताना निकृष्ट दर्जाचे केलेले आहेत तसेच गटारीचे छत सर्व फुटलेले आहेत. मजूर नसताना रोजगार हमी योजनेचे कामे सुरू आहेत घरकुल लाभार्थीने अनेक लाभार्थीने दुसरे घर दाखवून खोटे धनादेश लाटलेले आहे, तसेच वसंतनगर येथे महिला व पुरुष ग्रामसभा होत नाही कागदपत्रे दाखवून घरोघरी जाऊन संबंधित ग्रामसेवक सरपंच घरी जाऊन सह्या घेतात असे निर्दशनास आले आहेत.

वरील कामांची चौकशी करण्यात यावी, चौकशी न झाल्यास अखिल भारतीय बंजारा सेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही खाली सह्या केलेल्या सर्व कार्यकर्ते आमरण उपोषण पंचायत समिती पारोळा समोर करण्यात येणार आहे. याची दखल घ्यावी खालील सह्या करणाऱ्यांचे नाव कांतीलाल नायक अखिल भारतीय बंजारा सेना राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ताराचंद जाधव गणेश जाधव निरंजन जाधव किशोर जाधव निंबा जाधव अनार जाधव सुदाम जाधव गणेश जाधव आदी कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.


Protected Content

Play sound