किनगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कलाविष्कार हा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी सरपंच निर्मला पाटील यांनी रंगमंचाचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या प्रसंगी किनगाव केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ.प्रमोद सोनार, दहिगाव केंद्रप्रमुख विजय ठाकूर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानू पाटील, प्रसाद वंजारी,पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र ठाकूर, संजय पाटील, उपसरपंच तडवी तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य अजय छबू तडवी व इतर सदस्य व ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्ष वेधणारी होती. याप्रसंगी देशभक्तीपर गीते,लोकगीते, सिनेगीत यावर मुलामुलींनी धम्माल नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमात मनोरंजक उखाणे, प्रबोधन पर नाटिका, शेतकरी गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुलींनी शिवरायांचा जन्माचा सोहळा यावेळी सादर केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तर शाळेतील दोन विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करून गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजीव शेटे यांनी तर सूत्रसंचालन प्रीती राणे, शीतल राणेराजपुत व अमोल तिजारे यांनी तर आभार प्रदर्शन सुपडू कोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन अहिरे, विशाल कदम, मंदाकिनी पाटील, प्रमिला कोल्हे, प्रमोद रानेरापुत, अलका पाटील, जयश्री पाटील यांनी मेहनत घेतली.

Protected Content