इंडिया गॅरेज येथून वृध्दाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इंडिया गॅरेज जवळून वृध्दाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रवदन मुकुंद नांदेडकर वय ६२ रा. स्वातंत्र्य चौक, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ एसी ९१९३) ही स्वातंत्र्य चौकातील इंडिया गॅरेजजवळ ६ मार्च रोजी रात्री १० वाजता पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. ही घटन घडल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी १६ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक प्रतिभा पाटील हे करीत आहे.

Protected Content