अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तिघांना कठोर शिक्षा करा – महिला पदाधिकाऱ्यांची मागणी

यावल प्रतिनिधी I यावल तालुक्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन क्रूर नराधमांनी सामूहिकरित्या अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेध व्यक्त करीत त्या तिघा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पोलीस निरीक्षक सुधील पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, या पिडीत अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला पाहिजे. जोपर्यंत त्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही . आम्ही महिला रस्त्यावर उतरू आंदोलन करू व त्या अत्याचारीत पिडीत अल्पवयीन मुलीला न्याय दिल्या शिवाय राहणार नाहीत. या अत्याचाराच्या संतापजनक घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यासंदर्भात यावल तालुक्यातील महिला आघाडीच्या वतीने यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष व्दारका पाटील , काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकला इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिभा गुणवंत नील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नीलिमा दांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष यावल लतिका सावकारे, मुक्ताईनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक ममता आमोदकर, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष, त्या अत्याचारीत मुलीचे कुटुंब व गावातील तरुण महिला पुरुष ग्रामस्थ मोठया संख्येत यावल पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते.

Protected Content