वाइनचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन : रामदास आठवले

मुंबई- दारु आणि वाइन हे एकच आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुपरमार्केटसमध्ये वाइन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मागे न घेतल्यास रिपाईकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत चारोळी करत महाविकासआघाडी सरकारवर निशाणाही साधला. ‘ सुपरमार्केटमध्ये जर आला दारुचा माल, तर लोकांचे होणार फार हाल, सरकारची आहे चुकीचा चाल, भविष्यात या सरकारचे होणार हाल’ अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. वाइन आणि दारुत जमीन अस्मानाचा फरक आहे, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या युक्तिवादाला रिपाईप्रमुख रामदास आठवले यांनी आव्हान दिले आहे.

राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत सुपरमार्केटस आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाइन विक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १००० चौरस फुटांचे क्षेत्रफळ असलेल्या दुकानांमध्ये वाइन विक्रीसाठी ठेवता येईल.

 

Protected Content