जिल्हा परिषद शाळेत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याबाबत कार्यशाळा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अभ्यासाचा ताण हलका करतांनाच निसर्गाशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे, ह्या उदेशयाने जि..प.म.शाळा लोहारखेडे येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविणे आणि मातीपासून विविध वस्तुबनविणेची कार्यशाळा  नुकतीच संपन्न झाली.

 

सप्तपुट ललित कला महाविद्यालचे प्राचार्य अतुल मालखेडे ह्यांनी स्वत: उपस्थित राहून मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ति कशी बनवावी ? हे प्रात्यक्षिकासह करून दाखविले. हयासोबतच मातीपासून कमी कालावधीत वेगवेगळ्या कश्या वस्तु बनविता येतात हे करून दाखविले.विशेष म्हणजे ही कार्यशाळा शालेय वेळेनंतर घेण्यात आल्यावर सुददा मुलांचा उत्साह हा वाखानण्यासारखा होता.सादर कार्यशाळेचे आयोजन शाळेचे उपक्रमशील शिक्षक तथा मुख्याध्यापक मनोज लुल्हे ह्यांनी केलेले होते.ह्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक भूषण चौधरी केंद्रप्रमुख पिंप्रीनांदू शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य विशालनाना पाटील, जीवन चौधरी, मनोज जैतकर उपस्थित होते.

 

कार्यशाळेचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक श्री नितिन धोरण ह्यांनी केले. ह्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

 

मुलांमध्ये अनेक सुप्त गुण असतात. मुलांना मातीशी खेळायला कायम आवडते. ह्या खेळण्याच्या सवयीला उपक्रमाची जोड दिली तर निसर्गाशी आपले नाते अधिक घट्ट होते.ह्याशिवाय कामात बादल केल्याने थकवा कमी होतो. मुलांवरील अभ्यासाचा ताण हलका करणे, त्यांना जीवनाभुव देणे हा ह्या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. मुलांसाठी मोफत मार्गदर्शन करणारे प्रा. अतुल मालखेडे, प्राचार्य, सप्तपुट ललित कला महाविद्यालय ह्यांचे मनापासून आभार !.

– मनोज लुल्हे ,मुख्याध्यापक

 

मूर्ती, चित्रकलेच्या मुलांसोबत अनेक कार्यशाळा घेत आलोय.परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेत अश्या कार्यशाळेचे आयोजन पहिल्यांदाच अनुभवयास मिळाले. विशेष म्हणजे मुलांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणावर होता. मुले एकाग्रतेने अनेक तास कार्यशाळेत मनापासून रमल्याचे दिसून आले. शाळेत हयासारखे अनेक उपक्रम सुरू असल्याचे व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न दिसून येत आहेत. अश्या प्रकारच्या कार्यशाला सर्वत्र व्हयायला हव्यात.

– प्रा.अतुल मालखेडे, प्राचार्य, सप्तपुट ललित कला महाविद्यालय

Protected Content