Home Cities जळगाव देवेंद्र चौधरी यांना राष्ट्ररत्न पुरस्कार जाहीर

देवेंद्र चौधरी यांना राष्ट्ररत्न पुरस्कार जाहीर

0
103


 

devendra chaudhari

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील शाळेचे लिपिक देवेंद्र चौधरी यांना नुकताच डॉ.मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट यांच्यातर्फे राष्ट्ररत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला.

डॉ.मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे यांच्यातर्फे देवेंद्र सुभाषचंद्र चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय सरदार वल्लभभाई पटेल हा पुरस्कार दि. 31 ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील, अशोक मदाने, श्याम ठाकरे, गोविंदा लोखंडे, अजित चौधरी, योगेश भालेराव तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्‍तर कर्मचारी यांच्यातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound