नोबेल टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल जाहीर

जळगाव प्रतिनिधी । नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था आणि भरारी फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या टॅलेंट हंट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था आणि भरारी फाउंडेशनतर्फे जानेवारी महिन्यात नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा महाराष्ट्रातील ४२ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. यात राज्यभरातून ५२३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात परिक्षेत आठवी ते दहावी या गटात पंढरपूर येथील सिंहगड पब्लिक स्कूल इयत्ता नववीचा विद्यार्थी नीलय आशिष शहापूरे आणि अमळनेर येथील सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलचा आठवीचा विद्यार्थी हिमांशू निरंजन पेंढारे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तर इयत्ता पाचवी ते सातवी या गटात सातारा जिल्ह्यातील कराड येथील यशवंत हायस्कूलचा सहावीचा विद्यार्थी ओम कुट्टे आणि जळगावचा करुणेश मधुकर महाजन यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या परीक्षेत गुणवत्ता यादीत पाचवी ते सातवीतील १५० तर आठवी ते दहावीतील १५० विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी पात्र झाले आहे.

Protected Content