विमानाची भरारी ! : स्व. नानासाहेब चव्हाण स्मृती पॅनलचा दणदणीत विजय

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत स्व. नानासाहेब चव्हाण स्मृती पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मतदान प्रक्रिया येथील नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालयात रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडली. यावेळी ३ हजार तीनशे ४५ मतदात्यांपैकी २६२४ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यामुळे एकूण ७८.४४ टक्के मतदान करण्यात आले. विकास पॅनल, नानासाहेब चव्हाण स्मृती पॅनल व परिवर्तन पॅनल यांच्यात ही लढत होत आहे. १९ जागांसाठी ५१ उमेदवार हे रिंगणात उतरले आहे. मतदानाच्या दिवशी सर्व पॅनलच्या समर्थकांनी आपापल्या पॅनलच्या विजयाचा दावा केला होता.

दरम्यान, सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. यात प्रारंभी मतपत्रीका एकत्र करण्यात आल्या. यानंतर मतमोजणी सुरू झाली. पहिल्यापासून स्व. नानासाहेब चव्हाण स्मृती पॅनलने आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम ठेवली. यामुळे १९ पैकी तब्बल १७ जागांवर या पॅनलचे उमेदवार निवडून आले. तर, विकास पॅनलला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. यातील तिसर्‍या पॅनलच्या माध्यमातून आव्हान उभे करणार्‍या परिवर्तन पॅनलला मात्र खाते देखील उघडता आले नाही.

आज लागलेल्या निकालात सर्वसाधारण जागांमधून स्व. नानासाहेब चव्हाण स्मृती पॅनलचे डॉ.विनायकराव चव्हाण १५६६, भैय्यासाहेब पाटील१४८४, बाळासाहेब चव्हाण १३३५, धनंजय चव्हाण १३६४, अविनाश देशमुख १३०३, प्रमोद पाटील १४५२, बारिकराव वाघ १०२७, सुनिल देशमुख १११२, अड.साहेबराव पाटील ११७९, हंसराज पाटील १०६३ रावसाहेब साळुंखे १०९२, शेनपडू पाटील १०४० विजयी झाले. तर विकास पॅनलचे फक्त अरुण निकम १०४७ व विकास पाटील १०४२ यांना यश लाभले. तर उर्वरित जागांमध्ये चव्हाण स्मृती पॅनलचेच सोनूसिंग ठाकरे, महेश चव्हाण, भाऊसाहेब पाटील, सौ. पुष्पाताई भोसले व सौ अलकाताई बोरसे विजयी झाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: