अ‍ॅड. केतन ढाके यांच्यासह आठ मान्यवरांची अधिसभेवर नियुक्ती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांच्यासह आठ मान्यवरांची राज्यपालांनी नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ अंतर्गत कलम २८ (२) (यू) अन्वये कुलपती अर्थात राज्यपाल हे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या १० व्यक्तींचे अधिसभेवर नामनिर्देशन करतात. या अनुषंगाने आज राज्यपालांनी आठ सदस्यांची अधिसभेवर नियुक्ती केली आहे. राजभवनातून राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार यांच्या स्वाक्षरीचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर आठ जणांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.

या आठ जणांमध्ये सरकारी वकील, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. केतन ढाके यांच्यासह चाळीसगावच्या मीनाक्षी निकम, केदारनाथ कवडीवाले (दोंडाईचा, जि. धुळे), भानुदास येवलेकर (जळगाव), नरेंद्र नारखेडे (फैजपूर), जयंत उत्तरवार (नंदुरबार), नेहा जोशी (जळगाव) आणि रामसिंग वळवी (मु. कंजाला, पो. भगदरी, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) यांचा समावेश आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: