यावल महाविद्यालयात गांधी विचार-संस्कार परीक्षा

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील जळगाव  जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व गांधी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी विचार-संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

वर्तमान काळात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांचा  प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने ही संस्कार परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत महाविद्यालयातील विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला या परीक्षेत अनुक्रमे प्रथम महेश संजय अहिरे ,द्वितीय मोहिनी विलास फेगडे व तृतीय अंजुम छबु तडवी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले परीक्षेचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ एस पी कापडे यांनी केले या परीक्षेसाठी डॉ सुधा खराटे उपप्राचार्य प्रा ए पी पाटील प्रा एम डी खैरनार ,प्रा एस आर गायकवाड, डॉ पी व्ही पावरा, मिलिंद बोरघडे प्रा कामडी प्रा वसावे प्रा मोरे यांनी यशस्वीतेसाठी महत्वाचे परिश्रम घेतले.

 

Protected Content