प. वि. पाटील विद्यालयात नैसर्गिक रंग निर्मितीची कार्यशाळा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रंग खेळायला खूप आवडते. परंतु बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या निसर्गाला हानिकारक अशा रंगांचा वापर न करता घरगुती निसर्ग पूरक वस्तूंचा वापर करून रंग घरी कशा प्रकारे बनवायचे यांची कार्यशाळा केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात नुकतीच घेण्यात आली.

घरात उपलब्ध असणारे तांदळाचे पिठ , मकई चे पीठ , मैदा , टाल्कम पावडर , बीट , हळद , झाडाची हिरवी पाने , फुले अशा विविध वस्तूंचा वापर करत लाल ,पिवळा , निळा , गुलाबी , हिरवा असे रंग उपशिक्षक योगेश भालेराव यांनी मुलांना बनवून दाखवले आणि विद्यार्थ्यांनी त्याचे प्रात्यक्षिक यावेळी केले.

असे नैसर्गिक रंग आपण घरी तयार करून होळीचा आनंद घ्यावा कारण बाजारात मिळणारी काही रंग हे आपल्या आरोग्यासाठी घातक असतात म्हणून ते वापरणे आपण टाळावे असे मार्गदर्शन शाळेच्या मुख्य रेखा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरला पाटील तसेच खुशबू चौधरी यांनी सहकार्य केले.

 

 

Protected Content