जिल्हा महानगर भाजपा ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडीचे विविध मागण्यांचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी । कोरोना महामारीत सर्व ऑटो रिक्षा, स्कूल बस व्हॅन चालक मालक धारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने लक्ष देवून ऑटो रिक्षा, स्कूल बस व्हॅन धारकांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याची मागणी जळगाव जिल्हा महानगर भाजपा ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देवून केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या मार्च २०२० पासून कोवीड महामारीमुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यातील ऑटोरिक्षा, स्कूल बस व्हॅन चालक -मालकांवर व त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात राज्यशासनाला वारंवार निवेदन देवून आमच्या व्यथा मांडल्या तरी सुध्दा शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. अश परिस्थितीची जाणीव ठेवून वाहनधारक चालक व मालक यांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी सोबत विविध मागण्या सोडविण्यात याव्यात जेणेकरून बेरोजगारीवर तोडगा काढता येईल.

या निवेदनावर जिल्हाअध्यक्ष प्रमोदभाऊ वाणी, नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, उपअध्यक्ष दिलीपभाऊ वाघ, भाजपा महानगर ऑटो रिक्षा स्कुल व्हॅन उपाध्यक्ष संदीप वाणी, सचिव सुनिल चौधरी, राजेश माळी, दिपक माळी, गणेश माळी, मिंलीद आहिरे, दिनेश भावसार, प्रकाश बडगुजर, वसंत झुंजारराव, नाना वाणी, सुनिल वाणी, सुनिल चौधरी, दिपक माळी आदी उपस्थित होते.

Protected Content