स्व. कालिंदीबाई पांडे मतिमंद विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । श्री. संत गाडगे बाबा शैक्षणिक संस्था संचालित स्व. कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयात गो. से हायस्कूल येथे १९६५ च्या ११ व्या वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते.

या स्नेह संमेलनास ५७ वर्षांपूर्वीचे माजी विद्यार्थी जे अनेक क्षेत्रात नामांकित आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाचा ठसा उमटविला आणि सेवा निवृत्त होवून नातवंडासोबत या आधुनिकीकरणाची अनुभूती घेता आहेत. त्यांनी पुन्हा विद्यार्थी दशेत असतानांच्या बाल मित्रांना भेटतांना त्या जुन्या आठवणी, ती शाळेची जुनी इमारत, त्या काळातील शिक्षकवृंद ह्या सर्व गोष्टी मनचक्षु समोर उभ्या करून परमोच्च आनंद या दोन दिवसात मिळविला. स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाच्या सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. मंदा दवे (पांडे) मुंबई, विरुमती पाटील (नाशिक), जयमंगला नेरकर, आयोद्धा वाणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

तसेच स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण याप्रसंगी करण्यात आले. यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर तसेच सर्वांचे सन – १९६५ मधील वर्ग मित्र जे प्रभूस प्रिय झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान रामचंद्र ठाकूर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप पांडे यांनी केले. स्वागत समारंभात सर्वांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या स्नेह संमेलनात विरुमती पाटील यांनी सर्वांना पेन भेट देवून सर्वांचा सत्कार केला. मीनाक्षी पांडे यांनी सौभाग्य लेणे देवून सर्व महिलांचा सत्कार केला तसेच मंदा दवे यांनी हनुमान चालीसाचे पुस्तक भेट देवून सर्वांचा सत्कार केला. सर्व मित्रांनी जीवनातील सुख दुख:चे क्षण सर्वासोबत मनोगत व्यक्त करतांना वाटून घेतले.

तसेच गो. से. हायस्कूलला सुद्धा सर्वांनी भेट दिली. त्यावेळी या सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत पी. टी. सी.चे चेअरमन संजय वाघ, व्हाइस चेअरमन विलास जोशी, खलील देशमुख, मुख्याध्यापक आणि कर्मचारी वृदांनी केले. या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू सुध्दा भेट दिली. या स्नेह संमेलनात सहभागी सर्व माजी विद्यार्थी मित्र गोविंद देशपांडे, मुरलीधर पाटील, डॉ. दिलीपकुमार‌ पाटील, नवीनचंद्र कोटेचा, मानमल संचेती, रामचंद्र ठाकूर, विरुमती पाटील, सुभाष सावा, नारायण पाटील, आयोद्धा वाणी, पुरुषोत्तम डोलारे, कमलाकर जडे, चिंतामण घैसास, मंदाताई दवे, विजय ब्रम्हक्षत्रिय , प्रमोद मार्कंड, कलादेवी जोशी, मीनाक्षी पांडे, कांतीलाल दायमा, घनश्याम ओझा, भगवान पाटील, वनिता नेरकर, अनिल पाठक, नरेंद्र मोदी, कलावती पुजारी, रमेश भारतीया, रमेश पिंगळे, काशिनाथ चौधरी, दिंगबर देशपांडे, प्रकाश जोशी आदी सर्व उपस्थित होते. दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी या सर्व माजी विद्यार्थी मित्रांनी भरीव असे आर्थिक सहाय्य श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेस केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्व. कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाने पर्यंत केलेत. अशाप्रकारे उत्साहात हे दोन दिवशीय स्नेह सम्मेलन श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेच्या प्रांगणात साजरे झाले.

 

Protected Content