आ. शिरीष चौधरी यांनी दिली कोरपावली गावास भेट

यावल  प्रतिनिधी- यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आ. शिरीष  चौधरी यांनी कोरपावलीचे नवनिर्वाचीत सरपंच विलास नारायण अडकमोल यांच्या निवासस्थानी भेट दिली.

या वेळी आमदार चौधरी यांच्या सोबत जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, युवा नेते धनंजय शिरीष चौधरी ,पंचायत समितीचे गटनेता व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील, इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील, कॉग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी यांचे स्वागत सत्कार सरपंच विलास अडकमोल त्यांचे वडील नारायण अडकमोल यांनी केल. यावेळी गावातील विविध विकास कामांबाबत व आदी विषया संदर्भात सविस्तर चर्चा होऊन कोरपावली गावासाठी शासनाच्या विविध विधायक व विकासाच्या दृष्टीने भरघोस निधीमिळणेसंदर्भात सकारत्मक चर्चा झाली आमदार  चौधरी यांनी सुद्धा निधीदेण्यासंदर्भात सकारत्मका दर्शवली.

यावेळी माजी सरपंच तथा कॉंग्रेस ग्रामीण सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, समाजसेवक मुक्तार पटेल, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, इंजिनिअर अविनाश अडकमोल,प्रवीण अडकमोल,रईस पटेल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Protected Content