चौघुले प्लॉटमधील ‘तो’ गोळीबार व्हॉटस्ॲप स्टेटस ठेवण्यावरूनच !- डॉ. प्रविण मुंढे (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शनीपेठ हद्दीतील चौघुले प्लॉट भागात जुन्या वादामुळे निर्माण झालेल्या दोन गटात आज पुन्हा त्याच वादातून गोळीबार आणि दगडफेक झाली. आजचा झालेला प्रकार हा व्हॉटस्ॲपवर ठेवलेल्या स्टेटसमुळे झाला असून या गुन्ह्यात दोन्ही गटातील चार संशयितांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहिती नुसार दुपारी चार वाजेच्या सुमारास एक गट दुसऱ्या गटावर चाल करून आला. घटनास्थळ असलेल्या मनोज जयवंत शिंदे यांच्या घरावर दगडफेक झाल्याने पेलिसांनी त्याची चौकशी केली. त्याच्या सांगण्या प्रमाणे त्याचा भाऊ विजय आणि सारवान गट यांच्यात पुर्वी वाद झालेला होता. आज दुपारी चार वाजता विक्रम सारवानसह, लखन, सोनू, अक्षय, सुरज यांच्यासह १५-२० जणांचा गट हातात तलवारी घेवून चाल करुन आला. त्यांनी हल्ला चढवून दगडफेक केली, नंतर पळून गेले. तर, दुसऱ्या गटातील जखमी विक्रमच्या सोबतच्या तरुणांच्या सांगण्या प्रमाणे, विजय सारवान याने व्हॉटस्‌ ॲप स्टेटस ठेवत विजय व त्याच्या भावंडांना नाक्यावर येण्याची चिथावणी दिली होती. त्यानुसार हे, सर्व तीथे पोहचताच संबधीताने गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शनीपेठ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शनीपेठ हद्दीतील चौघुले प्लॉट भागात व्हाटस्ॲपवर ठेवलेल्या स्टेटसवरून झालेल्या वादातून गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जुन्याच्या वादातून झालेल्या संशयातून शिंदे गटातील एका संशयिताने गोळीबार केला असून या गुन्ह्यात दोन गटातील चार जणांना अटक करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

https://www.facebook.com/508992935887325/videos/941097973098422

 

Protected Content