शिवशंभू संघटनेच्या युवती विभागाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कविता पाटील

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावलतालुक्यातील दहिगाव येथील आपल्या सामाजीक उपक्रमाने लक्ष वेधणाऱ्या सामाजिक कार्यक्रर्त्या कविता पाटील यांची शिवशंभू संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारणीचे संस्थापक अध्यक्ष महादेव पाटील यांनी कुमारी.कविता पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन पंढरपूर येथे झालेल्या शिवशंभू संघटनेच्या वतीने संपन्न झालेल्या राज्य “शिवस्फुर्ती” राज्यस्तरीय मेळाव्यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पवार यांच्याहस्ते कविता पाटीलला नियुक्तीपत्र देवून युवती प्रदेशध्यक्षापदी निवड करण्यात आली. यापुर्वी संघटनेच्या माध्यमातुन कविता पाटील हिने तालुका जिल्हास्तरावर काम करतांना पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी विविध ठीकाणी वृक्षारोपण, रक्तदान, गोरगरीब व आदिवासी बांधवांना अन्नदान, गरीब गरजू सोबत पारंपारीक सण उत्सव साजरे करण्यात नेहमीच अग्रेसर असते. या राज्य अध्यक्षपदी निवडीनंतर बोलताना त्यांनी म्हटले आहे की, आपण संघटनेच्या माध्यमातुन जनसामान्यांच्या आवाज उठवणे, महिलांवर होणारे अन्याय व त्यांच्या हक्कासाठी आणी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नेहमी लढा देण्यासाठी तप्तर असेल असे कविता पाटील हिने निवडी नतंर पत्रकारांशी बोलतांना म्हटले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Protected Content