धनाजी नाना महाविद्यालयात करियरवर मार्गदर्शन

press conferance faizpur

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील धनाजी नाना महाविद्यालयात कै. बाळासाहेब चौधरी यांच्या जयंतीनिमित्त करियरबाबत मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १६ जून २०१९ रविवारी कै. लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांची जयंती. कै बाळासाहेब यांचे महाराष्ट्राच्या शिक्षण आणि समाज क्षेत्रातील योगदान विशेष उल्लेखनीय आहे. या अनुषंगाने स्मार्ट स्किल, नाशिक आणि धनाजी नाना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ जून सकाळी १० ते १ वाजे दरम्यान सेमिनार हॉल , धनाजी नाना महाविद्यालय येथे करियर गायडन्स आणि डीएमआयटी सेमिनार आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. आर. चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी डॉ चौधरी यांनी सांगितले अमित राठी हे ख्यातप्राप्त वक्ते कला , वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील करियर च्या विविध संधी ध्येय निश्‍चिती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणि आत्मविश्‍वास कसा वाढवावा यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. हे सेमिनार इयत्ता ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थी आणि पालकांसाठी आहे. यात विशेष करून डीएमआरटी या शास्त्रीय बुध्यांक मापन शास्त्रीय पद्धतीवर भर देण्यात येणार आहे. ही पद्धत चार वर्ष वयापासून पुढील मुलांसाठी लाभदायक असून बुध्यांक व्यक्तिमत्त्व, योग्य करियर ची निवड, शिकण्याची पात्रता, एटीडी प्रतिसाद देण्याची वेळ, मेंदूच्या कार्यशैली बद्दल वापरण्यात येते. सेमिनार साठी यावल आणि रावेर परिसरातील माध्यमिक शाळांना पत्रे पाठविली असून विद्यार्थी आणि पालकांना उपस्थितीचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी केले आहे.

या सेमिनार साठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरिषदादा चौधरी, उपाध्यक्ष प्रा एस के चौधरी, चेअरमन लीलाधर विश्‍वनाथ चौधरी, सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मार्गदर्शन व परिश्रम घेत आहेत.

Protected Content