यावलमध्ये ‘आपला दवाखाना’ सुरू ! : वैद्यकीय अधिकार्‍यांच्या हस्ते उदघाटन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सर्वसामान्य नागरीकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोणातुन यावल येथे ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला.

यावल येथील श्री स्वामी समर्थनगर परिसरात १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिना निमित्ताने आपला दवाखाना सुरू करण्यात आला. शहरी भागातील नागरीकांना आपल्या उपचारासाठी घरापासुन लांब जावुन आपल्या उपचारासाठी तांबावे लागते यासाठी दवाख्यान्यापासुन लांब राहणार्‍या नागरीकांना त्वरीत उपचार व आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या हेतुने शासनाने संपुर्ण राज्यातील शहरी भागात ५०० ठीकाणी दवाखाने उघडण्याची संकल्पना एक उत्कृष्ठ पाऊल उचलले आहे. या योजने अंतर्गत रूग्णांची विनामुल्य १७५ प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या व मोफत उपचार होणार आहे.

या दवाखान्याचा शुभारंभ ग्रामीण क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट आरोग्य सेवेने ओळखले जाणारे यावल तालुक्यातील हिंगोणा येथील प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज एम. तडवी यांच्या हस्ते फीत कापून व धन्वंतरी पूजन करून करण्यात आले.

या वेळी डॉ.अमोल रावते, डॉ राहुल गजरे ,डॉ अर्चना पाचपोळे, आरोग्य कर्मचारी जयंत पाटील ,नरेंद्र तायडे , आशिष शिंदे, सौ वारके, सौ प्रतिभा ठाकूर, शकील तडवी यांच्यासह श्री स्वामी समर्थनगर परिसरातील नागरीक व आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content