पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा धरणात बुडुन मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील खडकदेवळा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोविंद समाधान मोरे (वय – २३ रा. वाडे – गुढे ता. भडगाव ) हा युवक २७ एप्रिल रोजी तालुक्यातील खडकदेवळा येथील मावशीकडे आला होता. दरम्यान ३० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गोविंद हा धरणात पोहण्यासाठी गेला होता. मात्र गोविंद यास पाण्यास अंदाज न आल्याने त्याचा बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. सदरची घटना गावात कळाल्यानंतर परिसरातील पट्टीच्या पोहणार्‍यांनी गोविंद याचा शोध घेतला असता गोविंदचा मृतदेह आढळून आला नाही.

यानंतर १ मे रोजी होडीच्या साहाय्याने पुन्हा शोध मोहिम सुरु केली असता दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोविंद याचा मृतदेह आढळून आला. गोविंद याचा मृतदेह रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहे. मयत गोविंद मोरे यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, चार बहिणी असा परिवार असुन घरातला एकुलता एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Protected Content