पशूधन चोरी प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील चुंचाळे येथील पशुधन चोरीच्या प्रकरणात पोलीसांनी तिघांना अटक केली असुन त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की दिनांक २ ऑगस्ट रोजी अशोक साहेबराव धनगर (वय ४० वर्ष राहणार चुंचाळे ) यांच्या गुरांच्या वाडयातुन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. दरम्यान किनगाव गावातील चुंचाळे मार्गावरील सिसिटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातुन संशयीत आरोपी दिनेश बाळू पाटील (२६ वर्ष ) हा पोलीसांच्या रडारवर होता. यासोबत पोलीसांनी या गुह्यातील दुसरा संशयीत आरोपी ऋषिकेश राजेंद्र पाटील (२३ वर्ष राहणार राजोरा तालुका यावल ह.मु. चांदणी कुर्‍हा ता अमळनेर) व अरुण गोकुळ पाटील (३५ वर्ष राहणार चांदणी कुर्‍हा तालुका अमळनेर) यांना देखील अटक करण्यात आली.

त्यांच्या कडुन दोन लाख रुपये किमतीची चारचाकी बोलेरो वाहनासह सुमारे ४० हजार रुपये किंमतीची बैलजोडी , एक मोटरसायकल असे एकुण दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असुन या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे. या गुन्ह्यातील सर्व संशयीतांना दिनांक १७ रोजी अटक करण्यात आली असुन , सर्व संशयीत आरोपीयांना पोलीसांनी यावल येथे न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायाधिश यांनी पाच दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Protected Content