चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार घरच्या कम्पाऊंटवर आदळली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोल्हे नगर परिसरात येथे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने थेट घराच्या कंपाऊंडवर कार आदळल्याची घटना रविवारी १८ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. यात सुदैवाने कारच्या एअरबॅग उघडल्याने कारमधील दोघे बचावले आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर कोल्हे नगर येथे राजू भांगळे यांचे घर आहे. रविवारी १८ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जुने भगवान नगरकडून कार क्रमांक (एमएच १९ ईजी १७७८) ही कोल्हेनगरकडे भरधाव वेगाने येत होती. त्यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट राजू भंगाळे यांच्या घराच्या कंम्पाऊंच्या भींतीवर जावून आदळली. या घटनेत सुदैवाने कारमधील दोघेजण बॅग उघडल्याने बचावले आहे. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. जवळच कॉलेज असल्यामुळे हा रस्त नेहमी वर्दळीचा असतो, रविवार असल्याने रस्त्यावर कुणीच नव्हते. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. यावेळी क्रेनच्या मदतीने फसलेली कार बाहेर काढण्यात आली.

Protected Content