मुक्ताईनगरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बुथ प्रमुख आढावा बैठक

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर मतदारसंघाची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बुथ प्रमुखांची आढावा बैठक एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली तर अमळनेर आमदार अनिल पाटील, माजी आमदार अरुण पाटील,प्रदेश प्रवक्ता योगेश देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी मुक्ताई सूत गिरणी अध्यक्षा रोहिणी खडसे, माफदा अध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, संघटन सरचिटणीस सुनिल नेवे,किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जि प सदस्य रमेश पाटील, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील, बोदवड तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, रावेर तालुका अध्यक्ष किशोर पाटील, बोदवड बाजार समिती सभापती सुधिर तराळ,रावेर बाजार समिती सभापती सचिन पाटील,सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, पंकज येवले, खरेदी विक्री संघ सभापती दत्तू पाटील, मुक्ताईनगर शहराध्यक्ष राजेंद्र माळी, बोदवड शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, माजी सभापती वसंत पाटील, विलास धायडे,दिपक पाटील, सुनिल कोंडे, डॉ बि सी महाजन, हेमराज पाटील ,अतुल पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आ. अनिल पाटील यांनी उपस्थित बुथ प्रमुखांकडून त्यांच्या बुथ वरील मतदानाच्या आकडेवारी विषयी आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना आ अनिल पाटील म्हणाले एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी हे पूर्वीपासून संघटनशील आहेत या मतदारसंघातील नव्वद टक्के बुथ कमिटया स्थापन झालेल्या आहेत त्याबद्दल सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.तसेच विस्तृत मार्गदर्शन करताना त्यांनी मतदार यादी विषयी विस्तृत माहिती दिली उपस्थित बुथ प्रमुखांना मतदार यादी चा विस्तृत अभ्यास करण्या विषयी मार्गदर्शन केले. आगामी काळात बुथ कमिटया मजबूत करून वन बूथ थर्टी युथ चा मेळावा घेण्याबाबत सूचना केल्या.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्याचे उपस्थितांना आवाहन केले. यावेळी मार्गदर्शन करताना आ एकनाथराव खडसे म्हणाले कोणत्याही पक्षासाठी संघटन हे महत्त्वाचे असते संघटनेच्या जोरावर कोणत्याही निवडणुका जिंकता येतात याचा आपल्या सर्वांना अनुभव आहे. पश्चिम बंगाल मध्ये संघटनेच्या जोरावर तृणमूल कॉंग्रेस वीस वर्षांपासून राज्य करत आहे संघटनेची हि ताकद आहे. यासाठी आपसा आपसात मतभेद असतील तर ते विसरून संघटन मजबूत करा
प्रत्येक बूथ वर वन बुथ थर्टी युथ रचना करा लग्नाची वरात, अंत्ययात्रा ज्या ठिकाणी जाल तिथे पक्षाचा प्रचार करा मुख प्रसिध्दी हि सर्वात महत्वाची असते. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा विधानसभा निवडणुकीत संघटन मजबुत झाले तर आपले यश निश्चित असल्याचे त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले
यावेळी माजी आमदार अरुण पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विलास धायडे तर आभार प्रदर्शन प्रशांत पाटील यांनी केले.

Protected Content