युती संदर्भात पक्षश्रेष्ठींना विचारून निर्णय घेतला जाईल- माजी आ. दिलीप वाघ

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आगामी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीबाबत सद्यस्थीतीत कोणत्याच पक्षाशी युती झालेली नाही, पक्षश्रेष्ठींना विचारूनच निर्णय घेण्यात यईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

 

ते म्हणाले की, पाचोरा-भडगाव कृउबा समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे पदापेक्षा जास्त उमेदवार असल्याने या निवडणुकीत कोणाशी युती करायची, यासाठी भाजप, शिंदे शिवसेना गट, ठाकरे शिवसेना यांच्याशी युती बाबत चर्चा झाली. परंतु समाधान कारक असा निर्णय झालेला नाही. स्थानिक पातळीवर सहकार क्षेत्रात राजकारण नको, या तत्वावर निवडणूक जरी लढणार असलो तरी अद्याप कोणालाही शब्द दिलेला नाही किंवा सद्यस्थितीत कुठलाच निर्णय झालेला नाही. युतीचा निर्णय कार्यकर्त्याना तसेच माजी मंत्री आ. एकनाथ खडसे, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांचेसह पक्षश्रेष्ठींना विचारूनच निर्णय घेतला जाईल. अशी माहिती माजी आमदार दिलीप वाघ यांनी दिली.

 

पाचोरा- भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी आज १० एप्रिल रोजी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पाचोरा सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विकास पाटील, भुषण वाघ, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, भडगाव तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, रणजीत पाटील, हारुण देशमुख यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content