देविदास सावळे यांना ‘राष्ट्रीय शिक्षकरत्न’ पुरस्कार

Devidas Savale

पाचोरा प्रतिनिधी । येथील डोगरगावातील इ ५ वी स्कॉलरशिप शालेय स्पर्धा परीक्षा या पुस्तकाचे आगामी लेखक व मार्गदर्शन करणारे देविदास सावळे यांना अखिल भारतीय प्रतिभा साहित्य संमेलन नवी दिल्लीतर्फे नुकताच ‘राष्ट्रीय शिक्षकरत्न’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, देविदास सावळे हे आगामी लेखक असून ते विविध ठिकाणी मराठी विषयासाठी अतिथी मार्गदर्शक म्हणून ही नावलौकीकात आहेत. १५ सप्टेंबर रोजी इंडिया गेट आद्र भवन नवीदिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय भारत सरकार मंत्री ना. रामदास आठवले राज्यसभा सदस्य पदमश्री.डॉ. विकास महात्मे भारत सरकार मानव अधिकार आयोग सदस्य ज्ञानेश्वर मुळे, राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे भोसले, राज्यसभा सदस्य डॉ. नरेंद जाधव, लोकसभा सदस्य खा.सो. नवनीत रवी राणा यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Protected Content