कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘कृषी तंत्रज्ञान’ व्याख्यान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे ‘कृषी तंत्रज्ञान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर  कार्यक्रम प्राचार्य प्रा.डॉ. संध्या एम. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील होते. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील  विद्यार्थी या कृषी तंत्रज्ञान विषयावरील व्याख्यान कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला देश कृषीप्रधान असून कृषी तंत्राचा विकास आणि सद्यस्थितीत असलेल्या समस्या याविषयी मार्गदर्शक प्रा. संदीप पाटील (कृषी महाविद्यालय शिरपूर) यांनी उपयुक्त अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनोज पाटील यांनी केले तर आभार प्रा. सी. के. पाटील यांनी मानले. सदरहू कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, प्रा. डॉ. एस. पी. कापडे, प्रा. डॉ. एच.जी भंगाळे, प्रा. डॉ. आर. डी. पवार, प्रा. डॉ. पी. व्ही.पावरा, प्रा. ए.जी.सोनवणे, प्रा. आर.एस. तडवी, प्रा. एस.व्ही.कदम, प्रा. आर एस थिगळे उपस्थित होते.

Protected Content