विचार वारसा फाउंडेशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । विचार वारसा फाउंडेशन आयोजित १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व  रुग्णालय येथील रक्तपेढीसाठी विचार वारसा फाउंडेशन कडून रक्त संकलन करून देण्यात आले तसेच संध्याकाळी ६ वाजता जळगाव शहरातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रात  असलेल्या महिला सत्कार विचार वाचा फाउंडेशनच्या महिलांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरिता कोल्हे, पल्लवी देशमुख, शोभा चौधरी, सुमित्रा सोनवणे, आशा अंभोरे, मंगला मराठे, शकुंतला सोले, अलकनंदा  देशमुख, संगीता राजपूत, सुरेखा निकम,भारती जाधव,रिता वाघ, यांचा सत्कार करण्यात आला त यावेळी प्रमुख मान्यवर अभिषेक पाटील, रवि देशमुख ,गणेश सोनवणे, यशवंत  पाटील ,प्रदीप पाटील ,प्रवीणसिंह पाटील ,भगवान खंडाळकर ,दगडू मराठे, अमोल बिडे, योगेश सोनवणे, संदीप येवले, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल देशमुख व निलेश सपकाळे यांनी  केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, आशिष राजपूत, अभिजीत राजपूत, मयूर डांगे ,मंगेश मांडोळे, दीपक सनसे, संकेत म्हस्कर,गौरव डांगे,आकाश तोमर,आकाश राजपूत,ऋषि राजपूत,कल्पेश जाधव, विनोद ढमाले,मनोज निंबाळकर, बबलू सपकाळे ,देवेंद्र मराठे, योगेश सनसे, गणेश पाटील, हर्षल बराटे, सोपान जाधव, आदींनी कार्यक्रम यशस्वीते साठी प्रयत्न केले.

Protected Content