शिवसेना भवन, शाखा आणि निधी शिंदे गटाला द्या !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेचा निधी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने ठाकरे गटाला पुन्हा हादरा बसला आहे.

आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही, असं वारंवार शिंदे गटाने स्पष्ट केले होते. त्यामुळे शिवसेना भवन हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले असतांना सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने एक याचिका दाखल केली आहेत. त्यात, शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तूळात चर्चा सुरू आहे.

 

अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून सर्वांची झोप उडविली आहे. शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि शिवसेना धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने दिले. तर त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, माझी याचिका ही शिंदे गटाची याचिका नाही. त्यांच्याशी काहीच संबंध नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मी एक वकील आहे. तसाच मी मतदार आहे. महाराष्ट्रातील मतदार आहे. त्यामुळे मी याचिका दाखल केली आहे. मी शिंदेंची बाजू घेत नाही. मी कायद्याची बाजू घेत आहे. उद्या उद्धव ठाकरेच अध्यक्ष राहिले तर शिवसेना भवन, शाखा आणि निधी त्यांच्याकडे जाईल. जर शिंदे अध्यक्ष झाले तर सर्व गोष्टी शिंदेंकडे जातील. पण तोपर्यंत या गोष्टींवर स्टे आणण्यात यावा, अशी माझी मागणी आहे, असेही ॲड. आशिष गिरी यांनी म्हटले आहे.

Protected Content