जामनेर कृउबा समितीसमोर ट्रकच्या कॅबिनला आग

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर उभ्या असलेल्या ट्रकच्या कॅबिला अचानक लागलेल्या आगीत ६ लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

जामनेर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवार ८ एप्रिल रोजी रात्री १० ते ९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर ट्रक क्रमांक (एपी ३९ यु ५९६९) हा क्रमांकाचा ट्रक उभा होता. त्यावेळी अचानकपणे त्या ट्रकला ट्रकच्या केबिनला आग लागली. या आगीत एकूण ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी तुंगला नरसिम्हा वेंकटेश्वर राममूर्ती (वय-४२) रा. कांची, कांचीराला, आंध्रप्रदेश यांनी दिलेल्या खबरीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बिऱ्हाडे करीत आहे.

Protected Content