जळगावात मायनॉरिटी एनजीओ फोरमची बैठक उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात प्रथमच महाराष्ट्र मायोनिरिटी एनजिओ फोरम (एमएमएनएफ) मुंबई व अलखैर ट्रस्ट जळगाव च्या माध्यमाने व पिंच बॉटेलिंग जळगाव पुरस्कृत खान्देश स्तरीय प्रथम व्यापार कार्यशाळेचे आयोजन ईदगाह हॉल मध्ये करण्यात आले होते.

या एक दिवसीय कार्यशाळेत (सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजे पर्यंत) जळगाव, धुळे व नंदुरबार येथील २०० नवीन उद्योजकांची उपस्थिती होती. या कार्य शाळेचे अध्यक्षस्थानी मुफ्ती हारून नदवी तर स्वागत अध्यक्ष पदी फारूक शेख होते. प्रमुख मार्गदर्शक एम एम एन एफ चे संस्थापक अध्यक्ष झाकीर सिकलगर होते.

या बैठकीत व्यापाराचे वैशिष्ट्ये व संशोधन या विषयावर झाकीर सिकलगर यांनी मार्गदर्शन केले. यासोबत इफतेखार पटेल (उस्मानाबाद ); साजिद पटेल( शिरपूर); जफर शेख(पिंच बोटलिंग, जळगाव); यासिन शेख (सोलापूर); माजीद शेख (मुंबई); काझी मखदुम (बीड); एजाज मलिक ( जळगाव);जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक व मुफ्ती हारून नदवी यांनी मार्गदर्शन केले. या कार्य शाळेचे महत्व व उद्देश माजी विद्यापीठ रजिस्ट्रार काझी रफिक यांनी विशद केले. स्वागत अध्यक्ष फारूक शेख यांनी जळगाव मधील अल्पसंख्याक समाजात उद्योजकासाठी लागणारी क्षमता असल्याने कार्यक्रम घेण्याचे महत्व विषद केले.

कार्य शाळेचे सूत्र संचलन अहेसान सैयद (वरणगाव) यांनी तर आभार युसूफ शाह यांनी मानले.

Protected Content