हिंमत असेल तर मणीपूर शांत करून दाखवा : उध्दव ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान हे देशापेक्षा मोठे नसल्याचे सांगत त्यांच्यात हिंमत असेल तर मणिपूर शांत करून दाखवावे अशा शब्दांमध्ये उध्दव ठाकरे यांनी आज मोदी आणि शाह यांच्यावर हल्लाबोल केला.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज मेळावा झाला. यात उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आम्ही हिंदूच आहोत. तुमच्यामुळे आम्ही कॉंग्रेससोबत गेलो. अदानी बाबत प्रश्न विचारला तर तुमची बोबडी उडते. ३७० कलम काढलं तेव्हा पाठिंबा देणारी शिवसेनाचा होती. ३७० कलम काढूनही काश्मिरमध्ये अजून निवडणुका का होत नाही? काश्मिरमध्ये हिंदू सुरक्षित का नाही? याचे उत्तर द्या असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टिकास्त्र सोडले.

ठाकरे पुढे म्हणाले की, ’’समान नागरिक कायदा आणण्याच्या आधी, समान नाही, लोकसत्तेत आलेला अग्रलेख वाचा. कारण सामना अनेक लोक चोरून वाचतात आणि वरून सांगतात आम्ही वाचत नाही. समान नागरी कायदा म्हणजे काय आहे? हिंदूंना त्याचा किती त्रास होणार आहे, हे आधी लोकांना सांगा. यानंतर तुम्ही पाठिंबा मागा. पंतप्रधान हा देशापेक्षा मोठा नसतो. देशाची ओळख भारत, हिंदूस्थान आणि भारतीय अशी झाली पाहिजे. भारतीयांची ओळख मोदींचा अंध भक्त अशी होता कामा नये असे त्यांनी सुनावले.

Protected Content

%d bloggers like this: