आंतर महाविद्यालयीन जलतरण व टेबल टेनिस-२२ स्पर्धा मू. जे. महाविद्यालयात संपन्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव अंतर्गत, जळगांव विभाग आंतर महाविद्यालयीन जलतरण (पुरुष व महिला) तसेच टेबल टेनिस (पुरुष व महिला) स्पर्धा २०२२ दिनांक ०२ नोव्हेंबर २०२२ रोजी मू. जे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या. सदर स्पर्धा ह्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी ठरवून दिलेल्या नियमांच्या व अटींच्या आधीन राहून आयोजित केल्या गेल्या.

स्पर्धेचे उद्घाटन मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मूळजी जेठा महाविद्यालय जिमखाना समितीचे चेअरमन डॉ सी. पी. लभाणे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. पी.आर. चौधरी, डॉ. संजय चौधरी, डॉ. आनंद उपाध्याय, डॉ. नवनीत आसी, प्रा. सुभाष वानखेडे, डॉ. महेश पाटील, डॉ. अनिता कोल्हे प्रा. प्रविण कोल्हे, प्रा. अनिल पाटील व प्रा. अमर हटकर उपस्थित होते.

स्पर्धेत डॉ. नवनीत आसी, डॉ. आनंद उपाध्याय व डॉ. संजय चौधरी यांनी निवड व तांत्रिक समिती सदस्य म्हणून काम पहिले. टेबल टेनिस स्पधेचे पंच म्हणून  विजय विसपुते, सार्थक मुंदडा व हेमिंग काळे तर जलतरण स्पर्धेचे पंच म्हणून  अखिलेश यादव, कु. कोमल पाटील,  वैभव सोनवणे, संगीता चौधरी, निराशा सोनवणे, चंद्रकांत सूर्यवंशी, पंकज बाविस्कर व नवीन पाटील यांनी काम बघितले.

सदर स्पर्धा ह्या जळगांव विभाग क्रीडा समितीचे सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.

 

Protected Content