यावल येथील साने गुरूजी विदयालयात विज्ञान प्रदर्शन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे अपूर्व विज्ञान मेळावा तथा विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यात इयत्ता ५ वी ते १२ वी वर्गातील विद्यार्थ्यांनी तब्बल ४० विविध प्रकारचे उपकरणे सादर केली होती व या उपकरणांची माहिती देत त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

शहरात नगरपालिका संचलीत साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयाच्या आवारात अपूर्व विज्ञान मेळावा तथा विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी उपप्राचार्य ए. एस. इंगळे, पर्यवेक्षक व्ही. ए. काटकर, ज्येष्ठ शिक्षक डी.एस. फेगडे, पी. एन. सोनवणे, विज्ञान मंडळ प्रमुख उज्वला पाटील सह आदींची उपस्थिती होती.  सदर कार्यक्रमास सर्व विज्ञान शिक्षक व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या विज्ञान प्रदर्शनात परिक्षणाचे काम रूपाली चोपडे व आर. एस. बारी यांनी केले.

Protected Content