जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आंदोलन : विहिंपचा इशारा

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रभू श्रीरामांबाबत आक्षेपार्ह विधान करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आज विश्‍व हिंदू परिषदेने दिला आहे.

मुंब्रा मतदार संघाचे विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी जाणीव पूर्वक विश्वातील करोडो हिंदूचे आराध्य दैवत भगवान श्रीराम यांचे आहाराबद्दल विकृत टिपण्णी करून हिंदू धर्मीयांच्या भावना जाणीवपूर्वक दुखविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विकृत आ जितेंद्र आव्हाड याच्या वर तात्काळ गुन्हा दाखाल करा अन्यथा या विरोधात विश्व हिंदू परिषद चे तीव्र आंदोलनाचा इशारा प्रकरणी फैजपूर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात विश्वहिंदू परिषद बजरंग दल सह हिंदूत्व वादी संघटना पक्ष सर्व पक्षीय हिंदू जनांचा जन आक्रोश करित निषेधार्थ निवेदन देण्यात आले

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात श्रीरामांबद्दल एकेरी उल्लेख करत प्रभूच्या आहार, वनवास यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. श्रीरामांनी वनवासाला निघताना फळे, मध, व कंदमुळे यांवर आपले जीवन निर्वाह करेन असा संकल्प केला व मग ते वनवासासाठी बाहेर पडले. कुठलाही अभ्यास नसताना हिंदू समाजात जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आव्हाड हे करत आहेत. याबरोबर त्यांनी वेदांचा पण अवमान केला आहे.

२२ जाने. २०२४ रोजी अयोध्या येथे श्री रामलला भव्य मंदिरात विराजमान होणार असून सर्व भारतीयांचे व जगाचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे. हिंदू समाजाच्या व भारतीय जीवनाच्या इतिहासात हा अविस्मरणीय व वंद्य सोहळा असणार आहे. जगातील अतिशय महत्वाचे व्यक्ति या पवित्र सोहळ्यास उपस्थित असणार आहेत. या सर्व काळात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशात जातीय दंगली घडवून आणण्याचा कट रचला असावा अशी शंका येते. हा सोहळा उधळून लावण्यासाठी हे सर्व आव्हाड करीत आहेत.

तरी आम्ही आमदार जितेंद्र आव्हाड यांचेवर गुन्हा दाखल करत आहोत. आव्हाड यांचेवर भारतीय दंड संहिता १५३ अ, १५३ , २९८,५०५-१,२९५- अ, रिप्रेशनटेशन ऑफ पीपल कलमांनुसार ॲक्ट १२५ व १२३ (३ अ ) गुन्हा दाखल करण्यात यावा. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे
याप्रसंगी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल ,भाजपा, शिवसेना सह सर्व राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content