हिवाळी अधिवेशन : खा.पाटील यांनी घेतल्या आजी-माजी आमदारांच्या भेटी

unmesh patil 1

नागपूर प्रतिनिधी । येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी आज विधिमंडळात जुन्या व नव्या आमदार यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.

यात प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, माजीमंत्री तथा आमदार गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आ.किशोर पाटील, आमदार संतोष दानवे, आ.राहुल कुल, आ.राहुल आहेर, आ.नरहरी झिरवळ, आ.नितीन पवार, अनिल कदम, माजी मंत्री राम शिंदे, कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह अनेक आजी माजी आमदार मित्राच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. विशेषतः माजी जिल्हाध्यक्ष स्व.उदय बापू वाघ यांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या आमदार स्मिताताई वाघ यांची भेट घेतली. आपले दुःख विसरून पक्षाच्या आणि विधिमंडळ कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून त्यांची देखील भेट त्यांनी घेतली.

जून्या आठवणींना उजाळा
गेल्या पाच वर्षात विधानसभेत या सहकाऱ्यांसोबत केलेल्या कामकाजाच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा मिळाला. जळगाव लोकसभा मतदारसंघात नवनवीन योजना राबविणे आणि अंमलबजावणी करण्यासाठी सविस्तर चर्चा केली. सर्वाच्या शुभेच्छा, सदिच्छा भेटी घेतल्या, मतदारसंघातील काही कामाबद्दल निवेदने दिलीत.

Protected Content